Monday, March 2, 2026

Date:

काश्मीरच्या खोऱ्यात पुण्याच्या उद्योजकावर हल्ला: मदतीअभावी कौस्तुभ गनबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू

- Advertisement -

काश्मीरमधील गोळीबारात पुण्याचे उद्योजक ठार, वैद्यकीय व्यवस्थेचा फज्जा

विषय हार्ड न्युज, पुणे:-काश्मीरमधील पहलगाम परिसरात शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्याचे उद्योजक कौस्तुभ गनबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कौस्तुभ गनबोटे हे त्यांच्या पत्नी व मित्र संतोष जगदाळे यांच्यासह पर्यटनासाठी गेले होते. बैसरण घाटी परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या अचानक गोळीबारात त्यांना गंभीर जखम झाली.

गोळी त्यांच्या कमरेखाली लागल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांना मधुमेह असल्याने रक्त थांबत नव्हते. धावपळीमुळे जवळपास अर्धा तास कोणतीही वैद्यकीय मदत उपलब्ध झाली नाही. त्यांच्या पत्नीने अनेक ठिकाणी धावपळ करूनही मदत मिळवता आली नाही. त्यावेळी उपस्थित पर्यटक देखील भीतीमुळे असहाय्य होते.

या हल्ल्यात संतोष जगदाळे यांच्या खांद्याजवळही गोळी लागली असून, ते सध्या उपचाराधीन आहेत. कौस्तुभ यांचा मुलगा कुणाल गनबोटे वडिलांच्या प्रकृतीची माहिती मिळताच तात्काळ जम्मूला रवाना झाला.

कौस्तुभ गनबोटे यांनी ‘गनबोटे फरसाण हाऊस’ या नावाने गेली ३० वर्षे व्यवसाय उभारला होता. अत्यंत प्रेमळ, मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा परिसरात मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या अकाली जाण्यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

त्यांचा मृतदेह आज संध्याकाळी विमानाने पुण्यात आणण्यात येणार असून, अंतिम संस्कार उद्या सकाळी होणार आहेत.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

“राजे शिवबा” : बालकलाकारांच्या दमदार अभिनयातून स्वराज्याचा तेजस्वी रंगमंचीय सोहळा.

४ ते १५ वर्षांच्या चिमुकल्यांनी साकारला इतिहास; हाऊसफुल प्रयोगाला...

शिवसेनेच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर PMPML मधील संशयास्पद पदोन्नती प्रकरणाची चौकशी.

नियमबाह्य पदोन्नतीचा आरोप; त्रि-सदस्यीय समिती गठीत. विषय हार्ड न्युज:पुणे महानगर...

पुणे रेल्वे स्थानकावर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.

विषय हार्ड न्युज,पुणे : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक...

खेडशिवापूर–खानापूर गटातून पुजा नवनाथ पारगे रिंगणात‘घड्याळ’ वाजणारच – जनतेचा ठाम निर्धार.

हवेली पश्चिम भागाचा विकासाचा आवाज बुलंद! विषय हार्ड न्युज,खेडशिवापूर :...