Thursday, January 15, 2026

Date:

पहलगाम हल्ल्याविरोधात पुण्यात भाजपचे तीव्र आंदोलन; देशाच्या एकजुटीचा संदेश.

- Advertisement -


पहलगाम हल्ल्याविरोधात पुण्यात भाजपचे तीव्र आंदोलन; देशाच्या एकजुटीचा संदेश.

विषय हार्ड न्युज,पुणे, २३ एप्रिल: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आज लोकमान्य टिळक चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

“दहशतवाद्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह चोख प्रत्युत्तर देतील,” असे घाटे यांनी सांगितले. या आंदोलनात माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश चिटणीस वर्षा डहाळे यांची उपस्थिती होती. हल्ल्यात बळी पडलेल्या कै. कौस्तुभ गनबोटे यांच्या भगिनी अर्चना देवधरही या वेळी उपस्थित होत्या.

जावडेकर यांनी “370 कलम हटवल्यानंतर सुरू झालेला काश्मीरचा विकास थांबवण्यासाठी हा भ्याड हल्ला झाला,” असे मत व्यक्त केले.


Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष; प्रभागात कामाचीच पोचपावती — आंदेकर कुटुंबाचा दावा

पुणे (प्रतिनिधी पायल पोटभरे) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग...

पुण्यात लोकशाही धोक्यात; भाजप–महायुतीवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

पुणे( प्रतिनिधी पायल पोटभरे) :  महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या...