Monday, March 2, 2026

Date:

काश्मीर हल्ल्यावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंचा निषेध; अडकलेल्या पर्यटकांसाठी तत्काळ मदत

- Advertisement -

मुंबई, २३ एप्रिल

विषय हार्ड न्युज, पुणे:— काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांच्या मृत्यूनंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

हल्ल्यानंतर अडकलेल्या पुण्यातील पर्यटकांसाठी डॉ. गोऱ्हे यांनी तत्काळ संपर्क साधून मदत कार्याची माहिती घेतली. शासनाकडून लवकरच विमानसेवेची व्यवस्था केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक नागरिकांच्या मदतीबद्दल त्यांनी आभार मानले.

उपसभापती कार्यालयात हल्ल्यातील बळींसाठी श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “विघातक शक्तींना भारतीय एकतेचे प्रत्युत्तर मिळेल. एकसंघ भारत हीच खरी ताकद आहे.”

भारतीय लष्कर, डॉक्टर व आरोग्यसेवकांचे त्यांनी विशेष कौतुक केले आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या तत्परतेचे अभिनंदन केले.


Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

“राजे शिवबा” : बालकलाकारांच्या दमदार अभिनयातून स्वराज्याचा तेजस्वी रंगमंचीय सोहळा.

४ ते १५ वर्षांच्या चिमुकल्यांनी साकारला इतिहास; हाऊसफुल प्रयोगाला...

शिवसेनेच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर PMPML मधील संशयास्पद पदोन्नती प्रकरणाची चौकशी.

नियमबाह्य पदोन्नतीचा आरोप; त्रि-सदस्यीय समिती गठीत. विषय हार्ड न्युज:पुणे महानगर...

पुणे रेल्वे स्थानकावर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.

विषय हार्ड न्युज,पुणे : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक...

खेडशिवापूर–खानापूर गटातून पुजा नवनाथ पारगे रिंगणात‘घड्याळ’ वाजणारच – जनतेचा ठाम निर्धार.

हवेली पश्चिम भागाचा विकासाचा आवाज बुलंद! विषय हार्ड न्युज,खेडशिवापूर :...