Saturday, August 30, 2025

Date:

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर पर्यटन ठप्प; महाराष्ट्रातील पर्यटकांचे आंदोलन

- Advertisement -

श्रीनगर, 23 एप्रिल:

विषय हार्ड न्युज, पुणे ब्युरो:काश्मीरमधील सोनमर्ग आणि गुलमर्ग ही प्रसिद्ध पर्यटनस्थळे आजपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. यामुळे संपूर्ण काश्मीरमध्ये पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. श्रीनगरमधील प्रसिद्ध ‘दल लेक’ परिसर ओसाड झाला असून, येथे नेहमी पर्यटकांनी गजबजलेले शिकारा आणि हाऊसबोट आता रिकाम्या पडल्या आहेत. शिकाराचे चालक बोटीत झोपून पर्यटकांची वाट पाहत आहेत, तर रस्तेही सुनसान आहेत.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पर्यटक धनंजय जाधव आणि पूजा मोरे यांनी काश्मिरी नागरिकांसह दहशतवादाच्या विरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी लाल चौक येथे विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांसोबत आंदोलन केले. या आंदोलनात “भारत माता की जय” आणि “टुरिस्ट हमारी जान है” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

धनंजय जाधव आणि पूजा मोरे यांनी स्थानिक आमदार आणि खासदारांची भेट घेऊन महाराष्ट्रातील पर्यटकांची व्यथा मांडली. काश्मिरी प्रशासनानेही महाराष्ट्रीयन पर्यटकांसाठी मदतीचा हात पुढे करत सहकार्याचे आश्वासन दिले आहे.

याच दरम्यान, श्रीनगरमधील आर्मी 92 बेस हॉस्पिटलमध्ये पेहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांची त्यांनी भेट घेतली. पनवेलचे श्री. सुबोध पाटील आणि सौ. माणिक पाटील हे 40 जणांच्या ग्रुपसह या हल्ल्यात सापडले होते. एका पर्यटकाला उर्दू भाषेतील पुस्तक न वाचता आल्यामुळे ठार मारण्यात आले, तर सुबोध पाटील यांच्या मानेला गोळी चाटून गेली. सध्या त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत.

धनंजय जाधव आणि पूजा मोरे या घटनेनंतर मदत आणि संपर्कासाठी पुढाकार घेत असून, जखमींच्या नातेवाईकांशीही ते संपर्कात आहेत. “ही परिस्थिती अत्यंत भयानक असून, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सर्वांनी एकत्र यायला हवे,” असं आवाहन त्यांनी केलं आहे.


Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

ज्ञानेश्वरी वारीचा देखावा : महाराष्ट्राची वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा उपक्रम.

ज्ञानेश्वरी वारीचा देखावा : महाराष्ट्राची वारकरी परंपरा उजाळणारा आगळावेगळा...

सिंहगड रस्त्यावर मनसेची ठिणगी; मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांची धरपकड. उड्डाणपूल सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

विषय हार्ड न्यूज, धायरी, पुणे:सिंहगड रस्त्यावरील वडगावकडून स्वारगेटला जाणारा...

धायरी व आंबेगाव येथे गौराई साडी ड्रेपिंग कार्यशाळा उत्साहात पार पडली.

विषय हार्ड न्युज,धायरी, ता. पुणे – गौरी-गणपती उत्सवानिमित्त महिलांमध्ये...

नवले ब्रिजवर कोंडीत अडकलेले पुणेकर; रखडलेल्या कामावरून नागरिकांचा संताप उसळला.

विषय हार्ड न्युज,पुणे १८– नवले ब्रिज परिसरात रखडलेले बायपासचे...