Monday, March 2, 2026

Date:

UPSC परीक्षेत देशात २६ वा क्रमांक मिळवलेल्या शिवांश जागडेचा काँग्रेसतर्फे गौरव

- Advertisement -

विषय हार्ड न्युज, पुणे:वडगाव बुद्रुक येथील शिवांश सुभाष जागडे याने केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत देशात २६ वा क्रमांक पटकावून मोठे यश मिळवले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचा सत्कार खडकवासला काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्रीरंग नाना चव्हाण यांच्या हस्ते शिवांशचा सन्मान करण्यात आला. “मावळ भागातील सर्वसामान्य कुटुंबातील शिवांशने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी कलेक्टर अधिकारी बनून राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे. हा क्षण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आहे,” असे गौरवोद्गार चव्हाण पाटील यांनी या वेळी काढले.

या कार्यक्रमाला न-हे गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप खेडेकर, पुणे शहर काँग्रेस पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष धनंजय पाटील, हवेली तालुका किसान काँग्रेस अध्यक्ष शंकरराव दांगट, अनिकेत देशमुख, धनंजय पवार, अंबादास बिरादार, शुभम निकम आदी मान्यवर उपस्थित होते.


Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

“राजे शिवबा” : बालकलाकारांच्या दमदार अभिनयातून स्वराज्याचा तेजस्वी रंगमंचीय सोहळा.

४ ते १५ वर्षांच्या चिमुकल्यांनी साकारला इतिहास; हाऊसफुल प्रयोगाला...

शिवसेनेच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर PMPML मधील संशयास्पद पदोन्नती प्रकरणाची चौकशी.

नियमबाह्य पदोन्नतीचा आरोप; त्रि-सदस्यीय समिती गठीत. विषय हार्ड न्युज:पुणे महानगर...

पुणे रेल्वे स्थानकावर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.

विषय हार्ड न्युज,पुणे : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक...

खेडशिवापूर–खानापूर गटातून पुजा नवनाथ पारगे रिंगणात‘घड्याळ’ वाजणारच – जनतेचा ठाम निर्धार.

हवेली पश्चिम भागाचा विकासाचा आवाज बुलंद! विषय हार्ड न्युज,खेडशिवापूर :...