Thursday, January 15, 2026

Date:

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गळतीचा ओघ कायम; युवक नेते रोहन सुरवसे-पाटील यांचा राजीनामा

- Advertisement -

विषय हार्ड न्युज, पुणे:महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष सध्या गंभीर अडचणींचा सामना करत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाचा निरोप घेतला असून, ही गळती थांबण्याचे नाव घेत नाही. नुकतेच पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता भोरचे माजी आमदार आणि काँग्रेसचे मातब्बर नेते संग्राम थोपटे यांचे भाजपकडे झुकाव असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्का बसला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द केला.

राजीनामा पत्रात सुरवसे-पाटील यांनी लिहिले आहे की,
“मी काँग्रेसच्या विचारधारेप्रती निष्ठा ठेवून काम केले. कोणत्याही गटबाजीत न पडता पक्षाची जबाबदारी निभावली. जनतेच्या अडचणींना वाचा फोडण्यासाठी आणि पक्षाचे नाव उजळवण्यासाठी मी नेहमीच अग्रभागी राहिलो. युवक काँग्रेसच्या विविध आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.”

त्यांनी पुढे नमूद केले की, “२०२१ मध्ये युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सरचिटणीस म्हणून निवडून आल्यानंतर मी पदाला न्याय देण्याचा सतत प्रयत्न केला. काँग्रेस हा एक विचार आहे, जो आजही विविध स्तरांतील लोकांना आपलासा वाटतो. मात्र, पक्षांतर्गत अनेक बाबी कार्यकर्त्यांच्या मनाला न पटणाऱ्या आहेत. आज पक्ष कठीण काळातून जात असताना, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राजीनामा द्यावा लागत आहे, ही गंभीर बाब आहे. याचा गांभीर्याने विचार पक्षनेतृत्वाने करावा.”

सध्या काँग्रेसमध्ये नेत्यांमधील समन्वयाचा अभाव आणि अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. ही गळती थांबवण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.


Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष; प्रभागात कामाचीच पोचपावती — आंदेकर कुटुंबाचा दावा

पुणे (प्रतिनिधी पायल पोटभरे) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग...

पुण्यात लोकशाही धोक्यात; भाजप–महायुतीवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

पुणे( प्रतिनिधी पायल पोटभरे) :  महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या...