Monday, March 2, 2026

Date:

कात्रज परिसर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या सावटाखाली 27 वर्षे युवकाचा खून, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण

- Advertisement -

विषय हार्ड न्यूज ,पुणे – शहराच्या उपनगरात असलेल्या कात्रज परिसरातील संतोषनगरमध्ये रविवारी पहाटे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जागेच्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून झाल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.

गुन्ह्यातील मृत युवक शुभम चव्हाण (वय २६) याचा लाकडी दांडके, दगड, विटांच्या सहाय्याने अमानुष मारहाण करत खून करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार पहाटे साडेचार वाजता घडला असून, अमर साकोरे आणि त्याचे दोन साथीदार हे या खुनामागे असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

वाढती गुन्हेगारी – प्रशासनाला प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे कात्रज परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचं सावट पसरल्याचं स्पष्ट झालं आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, मागील काही महिन्यांत परिसरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या असून, पोलीस बंदोबस्त कमी असल्याने गुन्हेगार अधिकच बिनधास्त झाले आहेत.

स्थानिकांची मागणी – कायमस्वरूपी पोलीस पेट्रोलिंग आणि सीसीटीव्ही यंत्रणा

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, त्यांनी संतोषनगर परिसरात पोलीस पेट्रोलिंग वाढवण्याची आणि मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे. “आमचं रस्त्यावर चालणं सुद्धा असुरक्षित झालंय,” असं एका स्थानिक रहिवाशाने सांगितलं.

पोलिस पथकाने अथक प्रयत्नानंतर आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

“राजे शिवबा” : बालकलाकारांच्या दमदार अभिनयातून स्वराज्याचा तेजस्वी रंगमंचीय सोहळा.

४ ते १५ वर्षांच्या चिमुकल्यांनी साकारला इतिहास; हाऊसफुल प्रयोगाला...

शिवसेनेच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर PMPML मधील संशयास्पद पदोन्नती प्रकरणाची चौकशी.

नियमबाह्य पदोन्नतीचा आरोप; त्रि-सदस्यीय समिती गठीत. विषय हार्ड न्युज:पुणे महानगर...

पुणे रेल्वे स्थानकावर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.

विषय हार्ड न्युज,पुणे : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक...

खेडशिवापूर–खानापूर गटातून पुजा नवनाथ पारगे रिंगणात‘घड्याळ’ वाजणारच – जनतेचा ठाम निर्धार.

हवेली पश्चिम भागाचा विकासाचा आवाज बुलंद! विषय हार्ड न्युज,खेडशिवापूर :...