Monday, March 2, 2026

Date:

नांदेड सिटी मध्ये सुरक्षा रक्षकच बनले भक्षक…

- Advertisement -

नांदेड सिटी मध्ये सुरक्षा रक्षकच बनले भक्षक

किरकोळ कारणावरून तिघांना बेदम मारहाण

विषय हार्ड न्युज, पुणे :नांदेडसिटी टाऊनशिप मध्ये मधुवंती सोसायटीच्या मेनगेटवर गाडीस स्टीकर नसल्याच्या वादावरून एका कुटुंबातील महिलेसह तिघांना ८ ते १० सुरक्षारक्षकांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. उच्चभ्रू सोसायटीत ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रेरणा प्रफुल्ल सोनकवडे (वय ४२ वर्ष, फ्लॅट नं. यु/११०१ मधुवंती सोसायटी, नांदेडसिटी टाऊनशिप, नांदेडगाव ) यांनी फिर्याद दिली आहे. ८ तारखेला सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांचे पती प्रफुल्ल रावण सोनकवडे (वय ५२) त्यांचे काम संपवून घरी येत होते. त्यांचा पुण्यात रियल इस्टेटचा व्यवसाय असून मुले ओंकार व गायत्री हे शिक्षण घेत आहेत.

मधुवंती सोसायटीच्या मेनगेटवर सुरक्षा रक्षकांनी गाडीला सोसायटीचे स्टीकर नसल्याने थांबवून ठेवले. प्रफुल्ल यांनी पत्नीला सोसायटीचे रेसीडेन्सी कार्ड घेवून गेटवर बोलवले. सोसायटीचे रेसीडेन्स कार्ड घेवून गेटवर गेल्यावर बाऊन्सर महिला आश्विनी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) नेवरकर व अन्य रक्षक वाद घालुन अरेरावीची भाषा करून अंगावर धावून आले. धक्काबुक्की करून हाताने मारहाण केली. फिर्यादी व त्यांचा मुलगा ओंकार (वय २२) या लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ओंकार याच्या डोक्याला, तोंडास व इतर ठिकाणी मार लागला. तक्रार करण्यासाठी नांदेडसिटी पोलीस ठाण्यात गेले असता ससून हॉस्पीटल येथे जावून उपचार करण्यासाठी सांगण्यात आले. नांदेड सिटी पोलिसांनी नेवरेकर, अश्विनी यांच्या सह ८/१० जणांवर गुन्हा दाखल केला.

ओंकार आणि त्याची आई प्रेरणा यांना लाथा बुक्यांनी खूप मारहाण झाली. प्रफुल्ल हात जोडून माफी मागत होते, परंतु सुरक्षा रक्षक कुठल्याही परिस्थितीत ऐकण्यास तयार नव्हते.

पोलिसांनी देखील किरकोळ कलम लावले आहे, असा आरोप पीडित कुटुंबाने केला.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

“राजे शिवबा” : बालकलाकारांच्या दमदार अभिनयातून स्वराज्याचा तेजस्वी रंगमंचीय सोहळा.

४ ते १५ वर्षांच्या चिमुकल्यांनी साकारला इतिहास; हाऊसफुल प्रयोगाला...

शिवसेनेच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर PMPML मधील संशयास्पद पदोन्नती प्रकरणाची चौकशी.

नियमबाह्य पदोन्नतीचा आरोप; त्रि-सदस्यीय समिती गठीत. विषय हार्ड न्युज:पुणे महानगर...

पुणे रेल्वे स्थानकावर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.

विषय हार्ड न्युज,पुणे : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक...

खेडशिवापूर–खानापूर गटातून पुजा नवनाथ पारगे रिंगणात‘घड्याळ’ वाजणारच – जनतेचा ठाम निर्धार.

हवेली पश्चिम भागाचा विकासाचा आवाज बुलंद! विषय हार्ड न्युज,खेडशिवापूर :...