Thursday, January 15, 2026

Date:

सेंट्रो मॉलच्या लिफ्टमध्ये महिला अडकली; निष्काळजीपणाबद्दल गुन्हा दाखल…

- Advertisement -

लिफ्ट बंद पडल्याने ५५ वर्षीय महिलेच्या कपाळाला गंभीर दुखापत; पोलिसांची तत्पर कारवाई, मॉल प्रशासनाविरुद्ध एफआयआर दाखल..

विषय हार्ड न्युज,पुणे : गणेशखिंड रोडवरील सेंट्रो मॉलमध्ये लिफ्ट बंद पडल्याने एक दुर्दैवी अपघात घडला. लिफ्टमध्ये अडकलेल्या ५५ वर्षीय महिलेला काचेचा तुकडा लागून कपाळाला गंभीर दुखापत झाली. या निष्काळजीपणाबाबत शिवाजीनगर पोलिसांनी मॉल प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
                  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या महिला आपल्या दोन नातेवाईकांसह दिवाळीनिमित्त खरेदीसाठी सेंट्रो मॉलमध्ये गेल्या होत्या. खरेदीदरम्यान त्या लिफ्टने वर जात असताना अचानक लिफ्ट बंद पडली. महिला आणि नातेवाईक लिफ्टमध्ये अडकले. बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना महिलेबरोबर असलेल्या एका नातेवाईकाने लिफ्टच्या काचेवर हात मारला. त्यातून काचेचा तुकडा उडून महिलेच्या कपाळाला जखम झाली.
महिला जखमी झाल्यानंतर लिफ्टची देखभाल करणारे कर्मचारी आणि मॉल प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाहीत, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तातडीची मदत न मिळाल्याने उपस्थितांनीच पोलिसांना माहिती दिली. महिलेची नातेवाईक व  समाजसेविका नेहालिका चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेची सुटका करून तिला रुग्णालयात हलवले.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सतप्रित आवस्थी, परवेंदर कुमार, पराग हार्डे आणि अभिजित कोल्हटकर (मॉलचे प्रशासकीय अधिकारी तसेच लिफ्ट देखभाल जबाबदार) यांच्याविरुद्ध निष्काळजीपणा आणि हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजेच्या दरम्यान घडला होता.

          या तपासात झोन १ चे उपायुक्त (डीसीपी) कृशिकेश रावळे, मानवाधिकार कार्यकर्त्या नेहालिका चव्हाण, तसेच पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे व संदीप शेरकर यांनी तत्परतेने कार्यवाही केली. कायदेशीर सहाय्यासाठी अ‍ॅड. दीपेश श्याम चितारे आणि अ‍ॅड. सुरेंद्र काकासाहेब पाटील (शिरोळे) यांनी सक्रिय सहभाग घेतला.

    “नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. अपघातातील सर्व संबंधितांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल,”
कृशिकेश रावळे, उपायुक्त (झोन १), पुणे शहर पोलीस

    या घटनेनंतर शहरातील मॉल्समधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नियमित सुरक्षा तपासणी आणि लिफ्ट–एस्कलेटरच्या देखभालीसाठी ठोस धोरणाची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष; प्रभागात कामाचीच पोचपावती — आंदेकर कुटुंबाचा दावा

पुणे (प्रतिनिधी पायल पोटभरे) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग...

पुण्यात लोकशाही धोक्यात; भाजप–महायुतीवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

पुणे( प्रतिनिधी पायल पोटभरे) :  महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या...