


• गोपीनाथ व पुनम परदेशी यांचे उत्कृष्ट नियोजन; पुढील वर्षी अधिक भव्य आयोजनाची घोषणा.
विषय हार्ड न्युज,पुणे | २५ सप्टेंबर २०२५
नवरात्रनिमित्त पुण्यात लिंकिंन ब्लिस “नवरंग रासलीला” या भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. राजयोग लॉन्स येथे लिंकिंन ब्लिस व्हेंचर्सचे आयोजक गोपीनाथ परदेशी आणि पुनम परदेशी यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
१५०० हून अधिक सहभागींच्या उपस्थितीत पारंपरिक गरब्याचा जल्लोष साजरा झाला. विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी कडून लाठी-काठीचे प्रात्यक्षिक तसेच समस्त राजपूत महिला संघ कडून पारंपरिक तलवाररास या सादरीकरणांनी वातावरण भारावून टाकले.
पुनम परदेशी यांनी कॉसमॉस बँकेचे सहकार्याबद्दल आभार मानले तर गोपीनाथ परदेशी यांनी सांगितले की, “पारंपरिक कला, शौर्यकला आणि महिला सक्षमीकरण या सर्वांचा सुंदर संगम साधत विविधतेतून एकतेचा उत्सव साजरा करण्यात आला.”
सार्थक परदेशी व सिद्धांत राणा यांनी पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. महिलांचा सहभाग, शौर्य आणि कला यामुळे हा सोहळा पुण्यातील सांस्कृतिक जीवनात स्मरणीय ठरला.

