विषय हार्डन्युज,संगुएम, गोवा ३ जुलै २०२५: गोव्याच्या कृषी क्षेत्राला चालना देणारा आणि आदिवासी जीवनमानात आमूलाग्र बदल घडवणारा ‘धरती आबा जनभागीदारी अभियान’ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते संगुएम येथे सुरू झाला.

या अभियानाचा उद्देश केवळ शासकीय योजना राबवण्यापुरता मर्यादित नसून, आदिवासी समाजाच्या पारंपरिक ज्ञान, शेती पद्धती आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा सन्मान करत त्यांच्यातून स्वयंपूर्ण शेती निर्माण करणे हा यामागचा खरा हेतू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.“आमचा खरा डीएनए आदिवासी आहे. आणि त्यामुळेच आम्ही योजनांपेक्षा जनतेच्या विश्वासावर उभं राहणाऱ्या सहभागात्मक विकासावर भर देत आहोत,” असे ठामपणे सांगत मुख्यमंत्र्यांनी ३५०० हून अधिक वनहक्क सनदांचे वाटप, तसेच शालेय बस, आरोग्य शिबिरे, कृषी विकास प्रकल्पांची माहिती दिली.
आदिवासी आयोग, संशोधन केंद्र, आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालय, तसेच पारंपरिक कुणभी गाव व शाल यांचे जतन हे देखील कृषी व ग्रामीण संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री श्री जुआल ओराम यांनी सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक करत सांगितले की, “आदिवासी सक्षमीकरणासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.
नरेंद्र मोदी सरकारने यासाठी तब्बल ₹७९,००० कोटींची तरतूद केली आहे.”या अभियानामुळे पारंपरिक शेतीला नवसंजीवनी मिळणार असून गोव्याचा आदिवासी शेतकरी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करेल, असा विश्वास या उपक्रमाने दिला आहे.