अखेर डॉ.सुश्रुत घैसास यांचा राजीनामा..
विषय हार्ड न्युज, पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या प्रतिमेला सुरुंग लागणाऱ्या घटनांमुळे आणि रुग्णांची होणारी गैरसोय पाहता त्यांनी स्वेच्छेने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
तनिषा भिसे या रुग्णाच्या उपचारासंदर्भात झालेल्या वादानंतरच ही घटना घडल्याने, या प्रकरणाला अधिक गती मिळाली आहे. डॉ. घैसास यांनी रुग्णालय प्रशासनाला अधिकृतरित्या राजीनामा सुपूर्त केला असून, या राजीनाम्याची माहिती समोर येताच वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. तनिषा भिसे या अल्पवयीन रुग्णाच्या उपचारासाठी डॉ. घैसास यांनी अमानत रक्कम (deposit) भरावी लागेल, अशी अट घातल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला होता.
या आरोपानंतर सोशल मीडियावर रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. अनेकांनी अशा वर्तणुकीचा निषेध करत रुग्णालय व्यवस्थापनाकडून कारवाईची मागणी केली.