दीनानाथ मंगेशकर रुग्णालय महिला मृत्यू प्रकरणी डॉ. घैसास यांच्या देखील नर्सिंग होम फोडल्याच्या प्रकरणात भाजप आंदोलक महिलांवर गुन्हा दाखल.
Braking News: डॉ. सुश्रुत घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड केली. आंदोलक महिलांवर खासगी वस्तूची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विषय हार्ड न्युज ,पुणे:पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुगणालयाच्या निषेधार्थ पुण्यातील भाजप महिला आघाडीच्या महिलांनी डॉ. सुश्रुत घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड केली. या प्रकरणी आता आंदोलक महिलांवर खासगी वस्तूची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलंकार पोलीस ठाण्यात या महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी डॉ. घैसास यांनी 20 लाख रुपये मागितल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भाजपच्या महिला आघाडीच्या महिलांनी आक्रमक होत एरंडवणे भागातील नवसह्याद्री सोसायटीमध्ये असलेल्या नर्सिंग होमची तोडफोड केली.
विनाकारण तोडफोड केल्याने गुन्हा दाखल
दरम्यान, या तोडफोडी प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात दंगल आणि महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन अँड मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्यूशन्स (हिंसाचार व नुकसान किंवा मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम 2010 चे कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. सुश्रुत घैसास या दीनानाथ रुगणालयामध्ये स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मात्र डॉ. घैसास या नर्सिंग होममध्ये प्रॅक्टिस करत नाही. हे नर्सिंग होम त्यांच्या आई वडील आणि भावाच आहे. मात्र माहिती न घेता नर्सिंग होम फोडल्याच म्हंटल होतं आणि विनाकारण कुटुंबाला त्रास दिल्याच म्हंटल होत. त्यानंतर या आंदोलक महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही.
परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हणल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही. परिणामी गर्भवती महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र महिलेचा जीव गमावला. या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे.