पुणे, २८ मार्च २०२५ : शहरात पुढील सात दिवसांत हवामानाच्या स्थितीत लक्षणीय बदल अनुभवता येणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज देखील वर्तविण्यात आलेला आहे.
पुणे आणि महाराष्ट्रात सध्या तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे. पुढील काही दिवस हवामान मुख्यतः कोरडे आणि निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. २८ मार्च ते ३१ मार्च दरम्यान दुपारी किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने केले आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन :
वाढत्या तापमानासोबतच हवामान विभागाने येत्या काही दिवसांत राज्यातील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे. शहरात पुढील काही दिवस मात्र तापमानात चढ उतार पाहायला मिळणार आहे. नागरिकांनी वाढत्या तापमानामुळे पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी घराबाहेर पडणे टाळावे, नागरिकांनी वाढत्या तापमानाचा विचार करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
पुढील ६ दिवसाचा अंदाज :
– २८ मार्च : किमान तापमान १९ अंश सेल्सिअस, कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस, आकाश मुख्यतः निरभ्र राहील, दुपारी किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ होऊ शकते,
– २९ मार्च : किमान तापमान २० अंश सेल्सिअस, कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस, आकाश मुख्यतः निरभ्र राहील, दुपारी किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ होऊ शकते.
– ३० मार्च: किमान तापमान २० अंश सेल्सिअस, कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, आकाश मुख्यतः निरभ्र राहील, दुपारी किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ होऊ शकते
– ३१ मार्च: किमान तापमान २१ अंश सेल्सिअस, कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, आकाश मुख्यतः निरभ्र राहील, दुपारी किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ होऊ शकते.
– १ एप्रिल: किमान तापमान २१ अंश सेल्सिअस , कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, आकाश मुख्यतः निरभ्र राहील.
– २ एप्रिल: किमान तापमान २१ अंश सेल्सिअस, कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, आकाश मुख्यतः निरभ्र राहील.