दिव्यांग विद्यार्थ्यांना सहानुभूतीची नव्हे तर सक्षम बनविण्याची गरज आहे. यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे, भविष्यात हेच दिव्यांग खेळाडू राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून शहराच्या नाव लौकीकात भर पडतील असा सार्थ विश्वास महापालिकेचे क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उप आयुक्त पंकज पाटील यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व साई संस्कार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली येथील कृष्णानगर स्वामी विवेकानंद क्रीडांगण येथे आयोजित महापालिका परिसरातील मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आलेले होते,त्याचे उद्घाटन उप आयुक्त पंकज पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास माजी महापौर मंगलाताई कदम, उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत कोळप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढवळे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत कुंभार, कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षा सुप्रिया सुरगुडे,स्पर्धा प्रमुख रंगराव कारंडे, क्रीडा पर्यवेक्षक दीपक कन्हेरे, अनिल जगताप, अरुण कडुस, गोरक्ष तिकोणे, बन्सी आटवे, सुनील ओहोळ, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू शीतल मारणे, तसेच कामयानी संस्थेच्या प्रमुख माधवी थाडे, ब्रम्हदत्त विद्यालयाचे रावसाहेब कांबळे, स्पर्धा पंच अशोक नांगरे, अशोक जाधव, सेवा चव्हाण, जीवन देशमुख, यांच्यासह १० शाळेतील दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये लांब उडी, ५० मीटर धावणे, सॉफ्टबॉल, गोळा फेक अशा विविध खेळांच्या स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. पिंपरी चिंचवड शहरातील १० विद्यालयातील ३७५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये खेळाडूंच्या वयानुसार १३ ते १५ , १६ ते १८ व १९ ते २५ असे तीन गटांमध्ये मुलामुलींच्या वेगवेगळे गट तयार करण्यात आले होते.
यामध्ये पूर्णत: अंध ५० मीटर धावण्याच्या स्पर्धेतील मुलांच्या २१ ते २५ वयोगटात नितीन खरात , १६ ते १८ वयोगटात संस्कार फलके, १३ ते १६ वयोगटात देविदास पारधी, ८ ते १२ वयोगटात प्रथमेश जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळवला
तर मुलींच्या १८ ते २५ वयोगटात समीक्षा निकाळजे हिने प्रथम , सुप्रिया मोरे हिने द्वितीय तसेच संगीता दरेकर हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची यादी
८ ते १२ वयोगट सॉफ्टबॉल थ्रो मुले
१ )यश कदम, ब्रह्मदत्त संस्था
२) निखिल कसबे, संत गजानन संस्था चरोली
३) रणवीर नढे, कामायनी निगडी
स्वमग्न स्पर्धा ५० मीटर धावणे ८ ते १२ वयोगट मुले
१) अर्णव बोरुडे, कामयानी संस्था निगडी
२) मयंक ठाकरे, कामयानी संस्था निगडी
३) अभिषेक पिल्ले, कामयानी संस्थान निगडी
५० मीटर धावणे ८ ते १२ वयोगट मुले
१) श्रद्धा सुतार, कामयानी संस्था निगडी
२) सृष्टी घुले, कामयानी संस्था निगडी
३)विद्या कामात, कामायनी संस्था निगडी
५० मीटर धावणे १३ ते १५ वयोगट मुले
१) श्रेयस मोहिते, साई संस्कार संस्था
२) दक्ष सातकर, साई संस्कार संस्था
३) आदित्य कांबळे, साई संस्कार संस्था
सॉफ्ट बॉल ८ ते १२ वयोगट मुले
१) मयंक ठाकरे, कामायनी संस्था निगडी
२) अभिषेक पिल्ले, कामयानी संस्थान निगडी
३) आदित्य पाटील, कामायनी संस्थान निगडी
८ ते १२ वयोगट मुली
१) शष्ठी घुले, कामयानी संस्थान निगडी
२) विद्या कामत, कामायनी संस्था निगडी
१३ ते १५ वयोगट मुले
१) दक्ष सातकर, साई संस्कार संस्था
२) विजय खुडे, साई संस्कार संस्था
३) आदित्य कांबळे, साई संस्कार संस्था संभाजीनगर
१८ व पुढील वयोगट मुले
१) शुभम आंबोळकर, साई संस्कार संस्था
२) आदित्य निकम, कामायनी संस्था
३) विशाल आमले, साई संस्कार संस्था संभाजीनगर
मानसिक दिव्यांग मुली ८ ते १२ वयोगट पन्नास मीटर धावणे
१) श्रद्धा कांबळे, कामयानी संस्थान निगडी
२) पूर्वी शिंदे, कामयानी संस्था निगडी
३) अक्षरा कापूरकर, कामायनी संस्था निगडी
१३ ते १५ वयोगट १०० मीटर धावणे
१) कार्तिकी थिगळे, कामायनी संस्था निगडी
२) पूर्वा कणसे, संत गजानन संस्था चरोली
३) ऋचा कोळी, कामायनी संस्था निगडी
१६ ते १८ वयोगट १०० मीटर धावणे
१) आरती शिवशरण, कामयानी संस्था निगडी
२) मधुरा चव्हाण, साई संस्कार संस्था
३) अंजली दहात्ते, संत गजानन संस्था चरोली
१८ व पुढील वयोगट १००मीटर धावणे
१) दिपाली कराळे, ब्रह्मदत्त संस्था
२) प्रणिता, साई संस्कार संस्था
३) सुविधा, साई संस्कार संस्था
८ ते १२ वयोगट ५० मीटर धावणे मुले
१) श्री शैल्य जवळगे, कामयानी संस्था निगडी
१) यश कदम, ब्रह्मदत्त संस्था
२) रणवीर नडे, ब्रह्मदत्त संस्था
१३ ते १५ वयोगट १०० मीटर धावणे मुले
१) श्रवण नायडू, साई संस्कार संस्था
२) अरमान शेख, ब्रह्मदत्त संस्था
३) श्रेयस साळुंखे, साई संस्कार संस्था
१६ ते १८ वयोगट १०० मीटर धावणे मुले
१)शुभम राव राणे, कामयानी संस्था
२)तुषार चव्हाण, कामयानी संस्था
३)संकेत पडवळ, निवासी शाळा चारोली
१८ व पुढील वयोगट १०० मीटर धावणे मुले
१) प्रतीक परब, कामयानी संस्थान निगडी
२) वैभव साळवे, कामयानी संस्था निगडी
३) प्रसाद निवांदे, कामायनी संस्था
मानसिक दिव्यांग प्रवर्ग गोळा फेक
१६ ते १८ वयोगट मुले
१) तुषार चव्हाण, कामयानी संस्था निगडी
२) संकेत पडवळ, संत गजानन संस्था चरोली
३) शुभम राव राणे, कामायनी संस्थान निगडी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप आयुक्त पंकज पाटील यांनी केले. निवेदन क्रीडा शिक्षक हरिभाऊ साबळे यांनी केले तर क्रीडा अधिकारी अनिता केदारी यांनी आभार मानले.