


सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी गोरे यांच्या पुढाकारातून नागरिकांची तपासणी; विविध आजारांवर प्राथमिक निदान व मार्गदर्शन..
पुणे | प्रतिनिधी :
हिंगणे परिसरातील पार्थ साडी येथे द न्यू लाइफ फाउंडेशन आणि ओम शांती हेल्थ कॅम्प यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा पुढाकार सामाजिक कार्यकर्त्या व द न्यू लाइफ फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा अश्विनी गोरे तसेच ओम शांत हेल्थ कॅम्पचे अध्यक्ष जितेंद्र पुंडे यांनी घेतला होता.
या आरोग्य शिबिरामध्ये थायरॉईड, शुगर (मधुमेह), बीपी (रक्तदाब), पॅरालिसिस यांसह विविध आजारांची प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले. तज्ञ वैद्यकीय पथकाने रुग्णांची सखोल तपासणी करून त्यांच्या प्रकृतीनुसार पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन केले.
तसेच आयुर्वेदिक उपचार पद्धतीबाबत माहिती देत गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात आयुर्वेदिक औषधे उपलब्ध करून देण्यात आली. या शिबिराचा लाभ परिसरातील अनेक नागरिकांनी घेतला.
समाजातील सर्वसामान्य व गरजू नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. ते देखील आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येईल. उपस्थित नागरिकांनी अशा सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.

