


विषय हार्ड न्युज, मुंबई:लाख मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे. परंतु आपला लाखोंचा पोशिंदाच सोडून गेला, संपूर्ण महाराष्ट्र हळहळला,केवळ राष्ट्रवादीचा नाहीतर सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते हळहळले कारण आदरणीय अजित दादांसारखा नेतृत्व हे असं दोन-चार वर्षात पुढे आले नव्हते तर ती गेले 45 वर्षाची तपश्चर्य, प्रचंड कष्ट, मेहनत यातून घडलेले नेतृत्व,लोकनेते होते.भविष्यात असं नेतृत्व उभे राहील हे सांगणे कठीण आहे.त्यामुळे राज्याची खूप मोठी हानी आहे…आज आदरणीय सुनेत्रावहिनी उपमुख्यमंत्री पदी शपत घेत असताना सामाजिक माध्यमांमध्ये होणारी उलट सुलट चर्चा, टीका टीपणी या अत्यंत चुकीची आहे, आजच्या दु:खद, कठीण परिस्थितीला सामोरे जात असताना आपले दुःख बाजूला ठेवून स्वर्गीय अजित दादांच्या विचाराचा कृतीचा वारसा पुढे चालवला आहे,जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाल्या.मुळातच दादा हे वास्तववादी आणि विज्ञान वादी विचाराचे होते प्रत्यक्ष कृतीत पण होते.आपल्या दुःखापेक्षा जबाबदारीची जाणीव आणि भान हे महत्वाचे आहे हे दादांनी कितीतरी वेळा दाखवून दिले आहे त्यामुळे वहिनी चा हा निर्णय योग्यच आहे.राजकारणात अजितदादा नेतृत्व करत असताना अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी विनंती करून सुद्धा वहिनींनी राजकीय पद कधी घेतले नाही . कृषी आणि ग्रामीण पर्यटन, पर्यावरण,शिक्षण, रोजगार निर्मिती या क्षेत्रातील त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे.समाजकारणात काम करत असताना विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात केलेले भरीव कार्य त्यांनी केले.काटेवाडीला ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत काटेवाडी गावाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार असेल.महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या विकासासाठी केलेले कार्य असेल….शेतकऱ्यांचा नवीन आर्थिक स्त्रोत आणि शेतकऱ्याना प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा कृषी आणि ग्रामीण पर्यटनाच्या विकासासाठी शेताकऱ्यासाठी हक्काचे व्यासपीठ मार्ट राज्यस्तरीय संस्थेची स्थापना आणि केलेले मोलाचे मार्गदर्शन तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी सुनेत्रावहिनीच्या प्रयत्नतून मंजुर झालेले सरकारचे कृषी व ग्रामीण पर्यटन धोरण 2021 या व्यवसा याला गती देणारे ठरले.बारामती टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून चेअरमन पदाची धुरा सांभाळून हा सर्व महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या आणि त्यांच्या अमूलग्र बदल घडवणाऱ्या आदरणीय सुनेत्रावहिनीच होय.बारामती एन्व्हायरमेंटल फॉरमच्या माध्यमातून पर्यावरण क्षेत्रात केलेले कार्य पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एक आदर्श पायंडा त्यांनी घालून दिला.राज्याच्या उपमुख्यमंत्रीची सुविद्य पत्नी आहेच पण त्या स्वतः सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या एक सक्षम महिला नेतृत्व आहे…
