


“तुतारी वाजणारच!”—धनराज जोरींचा गगनभेदी नारा
विशाल भालेराव
विषय हार्ड न्युज-खानापूर पंचायत समितीच्या मतदानाची तारीख जवळ येत असताना खानापूर गणात प्रचाराला कमालीचा वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाचे अधिकृत पंचायत समिती उमेदवार धनराज किसन बाप्पू जोरी यांच्या प्रचारात वाड्या-वस्त्यांवर नवचैतन्याचे वातावरण दिसून येत आहे. कार्यकर्त्यांचा जोश, महिलांचा पुढाकार आणि तरुणांचा वाढता प्रतिसाद यामुळे प्रचाराला धार मिळाली आहे.
धनराज जोरी यांच्या प्रचाराची धुरा महिलांनी हाती घेतली असून त्या घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधत आहेत. सर्वांगीण विकास, महिलांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून मदत, तसेच बचत गटांना बळ देण्याच्या मुद्द्यांवर त्या ठामपणे भूमिका मांडत आहेत. “तुतारी वाजवणारा माणूस” हे पक्षचिन्ह लक्षात ठेवून मतदान करण्याचे आवाहन करत वाड्या-वस्त्यांतून प्रचार फेऱ्या सुरू आहेत. या फेऱ्यांना भगिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
किसन बाप्पू जोरी यांनी बचत गट, शालेय विद्यार्थी आणि तरुणांसाठी केलेल्या कामांचा उल्लेख महिलांकडून केला जात असून रोजगारनिर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मतदारांना पटवून दिले जात आहे. अनेक महिलांना व तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या कामगिरीचा विश्वासार्ह ठसा या प्रचारातून ठळकपणे उमटत आहे.
यापुढे धनराज जोरी यांना पंचायत समिती सदस्यपदी संधी दिल्यास खानापूर गणाचा कायापालट घडवून आणण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. “गाव तिथे वाचनालय, महिलांसाठी रोजगार, तरुणांसाठी रोजगारनिर्मिती” ही विकासाची स्पष्ट दिशा मांडली जात आहे. स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका उभारण्याच्या घोषणेमुळे नवमतदार तरुण-तरुणींमध्येही धनराज जोरींना वाढता पाठिंबा मिळत आहे.
हळदी-कुंकूच्या माध्यमातून महिलांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेणे, भविष्यात रोजगारनिर्मितीवर भर देणे—या मुद्द्यांमुळे प्रचाराला मानवी स्पर्श मिळाला आहे. परिणामी खानापूर गणात एकच चर्चा ऐकू येत आहे—
“वारं फिरलंय, आमचं ठरलंय… बाप्पूंचा धनराज विजयी होणार!”


