


विशाल भालेराव
विषय हार्ड न्युज, पुणे – रोजगाराच्या शोधात असलेल्या बसचालकांसाठी दिलासादायक बातमी असून, कात्रज परिसरात PMPML CNG बससाठी चालक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनुभवी व पात्र चालकांना येथे आकर्षक पगारासह विविध भत्ते देण्यात येणार असून, PF आणि ESIC सारख्या महत्त्वाच्या सामाजिक सुरक्षा सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
सदर भरतीमुळे स्थानिक युवकांना स्थिर आणि सुरक्षित नोकरीची संधी मिळणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला देखील सक्षम मनुष्यबळ मिळणार आहे. बस बॅच (वैध ड्रायव्हिंग बॅच) आवश्यक असून, पात्र उमेदवारांनी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील क्रमांकावर त्वरित संपर्क करावा—
संपर्क : लोखरे – ८९५६१७३९६५
ही संधी दवडू नये, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत असून, पात्र बसचालकांनी मोठ्या संख्येने पुढे यावे, असे सांगण्यात आले आहे.
