Monday, February 2, 2026

Date:

कोंढणपूर येथे शिवसेनेचा भव्य प्रचार शुभारंभ; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्तीप्रदर्शन

- Advertisement -

विशाल भालेराव

विषय हार्ड न्युज – खेडशिवापूर–खानापूर परिसरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचा भव्य प्रचार शुभारंभ बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी आई तुकाईदेवी मंदिर प्रांगण, तीर्थक्षेत्र कोंढणपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या प्रचार शुभारंभास महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, कार्यक्रमाला सकाळी १०.०० वाजता सुरुवात होणार आहे.
या वेळी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा जाहीर प्रचार करण्यात येणार असून,
८३ खेडशिवापूर पंचायत समिती गणातून सौ. शुभांगी राजू खिरीड,
४२ खेडशिवापूर–खानापूर जिल्हा परिषद गटातून सौ. रूपाली रमेश कोंडे,
तसेच ८४ खानापूर पंचायत समिती गणातून श्री. विश्वंभर पोपटराव मांजरे हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने शिवसेनेची ताकद, संघटनशक्ती आणि जनाधार यांचे दर्शन घडणार असून, कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. विकास, स्थानिक प्रश्न, महिलांचे सक्षमीकरण आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी कटिबद्ध असलेले हे उमेदवार जनतेचा विश्वास संपादन करतील, असा विश्वास शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या निवडणुकीत मतदारांनी ‘धनुष्यबाण’ या शिवसेना पक्षाच्या चिन्हासमोरील बटन दाबून उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदान दिनांक : गुरुवार, ०५ फेब्रुवारी २०२६
वेळ : सकाळी ०७.३० ते सायं. ०५.३०
या भव्य प्रचार शुभारंभामुळे खेडशिवापूर–खानापूर परिसरातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणूक लढत अधिकच चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

खेडशिवापूर–खानापूर गटातून पुजा नवनाथ पारगे रिंगणात‘घड्याळ’ वाजणारच – जनतेचा ठाम निर्धार.

हवेली पश्चिम भागाचा विकासाचा आवाज बुलंद! विषय हार्ड न्युज,खेडशिवापूर :...

कै. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्यावर शोककळा; सुनेत्राताई पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ.

"हा आनंदाचा नव्हे, कर्तव्याचा क्षण; सुनेत्राताई पवार यांची भूमिका...

भावनिक प्रतिक्रिया : अभिनेता व मॉडेल रवींद्र ठाकूर यांचा अजित पवारांबद्दल शब्दांत न मावणारा शोकभाव.

विषय हार्ड न्युज पुणे :महाराष्ट्राच्या राजकीय विश्वाला हादरवून टाकणाऱ्या...