Monday, February 2, 2026

Date:

खानापूर गणात काटे की टक्कर; लक्ष्मण दारवटकर यांची अचानक माघार, राजकीय समीकरणे बदलली

- Advertisement -

विशाल भालेराव

सिंहगड–खानापूर गणातील पंचायत समिती निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असतानाच एका महत्त्वाच्या इच्छुक उमेदवाराच्या माघारीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खामगाव मावळ येथून इच्छुक असलेले मावळा जवान संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण दारवटकर यांना त्यांच्या-त्यांच्या पक्षांकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक न लढवता त्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचा स्पष्ट निर्णय घेतला आहे.
या अनपेक्षित माघारीनंतर खानापूर गणातील संपूर्ण राजकीय समीकरणे बदलली असून, दारवटकर यांचा पाठिंबा नेमका कुणाकडे वळतो, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे आणि उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
दारवटकर हे गावातील प्रभावी आणि लोकमतात असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सातत्याने जनतेमध्ये मिसळत, प्रत्यक्ष कामातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे विश्वासाची ठोस वोटबँक असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, दारवटकर यांच्या भूमिकेचा थेट परिणाम अंतिम निकालावर होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या माघारीनंतर आता खानापूर गणातील लढत अधिकच काट्याची बनली असून, प्रत्येक हालचाल निर्णायक ठरणार आहे.
दरम्यान, येत्या काळात लक्ष्मण दारवटकर कोणती भूमिका घेतात, कोणाला जाहीर पाठिंबा देतात की तटस्थ राहतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीत झाले आहे. त्यांच्या एका निर्णयानेच खानापूर गणातील सत्ता-समीकरणे उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लक्ष्मण दारवटकर यांच्याशी संपर्क साधला आसता ते म्हणाले

“ज्याच्या मनात खर्‍या अर्थाने सर्वसामान्य लोकांचा कळवळा आहे, त्यालाच पाठिंबा मिळायला हवा.
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा ज्यांच्या अंगी उतरलेला आहे, तोच खरा लोकांचा प्रतिनिधी आहे.
नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकांनी हे स्पष्ट करून दाखवले आहे की आजच्या व्यवस्थेत सर्वसामान्य माणसासाठी निवडणूक लढवणेच अवघड करून टाकले आहे. पैसा आणि सत्तेच्या राजकारणाने महाराष्ट्राला नेमकं कुठे नेऊन ठेवलं आहे, हा प्रश्न प्रत्येक संवेदनशील मनाला अस्वस्थ करतो.
सर्वसामान्य युवकांनी फक्त नेत्यांच्या सतरंज्या उचलायच्या का, की स्वतःच्या हक्कासाठी, स्वाभिमानासाठी आणि बदलासाठी उभं राहायचं—आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे.”

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

खेडशिवापूर–खानापूर गटातून पुजा नवनाथ पारगे रिंगणात‘घड्याळ’ वाजणारच – जनतेचा ठाम निर्धार.

हवेली पश्चिम भागाचा विकासाचा आवाज बुलंद! विषय हार्ड न्युज,खेडशिवापूर :...

कै. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्यावर शोककळा; सुनेत्राताई पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ.

"हा आनंदाचा नव्हे, कर्तव्याचा क्षण; सुनेत्राताई पवार यांची भूमिका...

भावनिक प्रतिक्रिया : अभिनेता व मॉडेल रवींद्र ठाकूर यांचा अजित पवारांबद्दल शब्दांत न मावणारा शोकभाव.

विषय हार्ड न्युज पुणे :महाराष्ट्राच्या राजकीय विश्वाला हादरवून टाकणाऱ्या...