


पुणे | प्रतिनिधी – विशाल भालेराव
विषय हार्ड न्युज – हातात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो, डोळ्यांत ठामपणा आणि चेहऱ्यावर अन्यायाविरोधातील संतप्त भावना—हा केवळ फोटो नसून संविधाननिष्ठेचा जाहीर एलान आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या दृश्यात महिला पोलीस कर्मचारी बाबासाहेबांचा विचार जपत, हक्क, सन्मान आणि न्यायासाठी उभ्या असल्याचे स्पष्टपणे दिसते.
“नोकरी, वर्दी, मंत्रिपद, फौजफाटा, मोर्चे, सत्तासंपत्ती—सारे काही फाट्यावर मारून बाबासाहेबांचा विचार जपत आहोत. प्रत्येक भीमसैनिक तुमच्या सोबत आहे,” असा ठाम संदेश या प्रतिमेतून दिला जात आहे. हा संदेश केवळ भावना व्यक्त करणारा नसून, संविधान, समता आणि न्याय या मूल्यांवरील निष्ठेची साक्ष देणारा आहे.
आज देशभरात अधिकार, सन्मान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत प्रश्न उपस्थित होत असताना, वर्दीतल्या महिला पोलिसांचा हा निर्धार अनेकांना प्रेरणा देणारा ठरत आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपत अन्यायाविरोधात उभे राहण्याची ही भूमिका समाजातील प्रत्येक घटकाला विचार करायला लावणारी आहे.
हा आवाज केवळ घोषवाक्य नाही—तो संविधान वाचवण्याचा, हक्क जपण्याचा आणि न्यायासाठी अखंड लढण्याचा निर्धार आहे.
