Monday, February 2, 2026

Date:

“आमचं ठरलंय… रामकृष्ण हरि, वाजवा तुतारी!” खानापूर गणात धनराज बाप्पू जोरी प्रचारात आघाडीवर

- Advertisement -

विषय हार्ड न्यूज (विशाल भालेराव):सिहगड – खानापूर गणात निवडणुकीची हवा आता स्पष्टपणे एका दिशेने वाहू लागली आहे. “आमचं ठरलंय… रामकृष्ण हरि, वाजवा तुतारी!” या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून, धनराज बाप्पू जोरी यांना उमेदवार म्हणून प्रचंड जनसमर्थन मिळताना दिसत आहे.

धनराज बाप्पू जोरी हे केवळ भागातीलच नव्हे, तर घरातील उमेदवार असल्याची भावना गावकऱ्यांच्या मनात ठसठशीतपणे दिसून येत आहे. प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठांचा सहभाग, यामुळे खानापूर गणात ते प्रचारात आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

गावकऱ्यांनी स्वतःहून विडा उचलत धनराज बाप्पूंच्या विजयाचा संकल्प केला असून, ठिकठिकाणी जल्लोषाचे वातावरण आहे. त्यांच्या अंगावर विजयाचा गुलाल उधळत, “हीच खरी किसन बाप्पूंना श्रद्धांजली,” अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत. हा विजय केवळ एका व्यक्तीचा नसून, कुटुंबातील संस्कार, प्रामाणिक नेतृत्व आणि लोकांच्या विश्वासाचा विजय असल्याचे बोलले जात आहे.

तुतारीच्या निनादात, गावागावांतून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे खानापूर गणात निवडणूक आता एकतर्फी होत असल्याची चर्चा सुरू आहे. जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची ताकद आणि घराघरातून मिळणारा पाठिंबा—या जोरावर धनराज बाप्पू जोरी यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.

खानापूर गणात एकच सूर—

“रामकृष्ण हरि… वाजवा तुतारी!”

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

खेडशिवापूर–खानापूर गटातून पुजा नवनाथ पारगे रिंगणात‘घड्याळ’ वाजणारच – जनतेचा ठाम निर्धार.

हवेली पश्चिम भागाचा विकासाचा आवाज बुलंद! विषय हार्ड न्युज,खेडशिवापूर :...

कै. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्यावर शोककळा; सुनेत्राताई पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ.

"हा आनंदाचा नव्हे, कर्तव्याचा क्षण; सुनेत्राताई पवार यांची भूमिका...

भावनिक प्रतिक्रिया : अभिनेता व मॉडेल रवींद्र ठाकूर यांचा अजित पवारांबद्दल शब्दांत न मावणारा शोकभाव.

विषय हार्ड न्युज पुणे :महाराष्ट्राच्या राजकीय विश्वाला हादरवून टाकणाऱ्या...