


विशाल भालेराव.
विषय हार्ड न्युज,पानशेत –
राजगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढावळे येथे जोरदार प्रचार करण्यात आला. यावेळी पानशेत–विंझर जिल्हा परिषद गटातील उमेदवार श्री. अमोलभाऊ नलावडे तसेच पानशेत पंचायत समिती गणातील उमेदवार सौ. सुवर्णा किरणभाऊ राऊत यांनी गावात प्रत्यक्ष भेट देत ग्रामस्थांचे आशीर्वाद घेतले.
या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी संपर्क साधत विकासाची भूमिका मांडली. उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधून परिसरातील प्रश्न, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि शेतीविषयक अडचणी जाणून घेतल्या. “सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे आणि विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून आम्हाला संधी द्या,” असे आवाहन उमेदवारांकडून करण्यात आले.
ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत दोन्ही उमेदवारांना पाठिंबा दर्शवला. “काम करणाऱ्यांनाच आमचा कौल” अशी भावना व्यक्त करत, अमोल नलावडे आणि सुवर्णा राऊत यांना भरघोस मतदान करून विजयी करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला.
एकूणच पानशेत गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाली असून, वाढता जनसमर्थन पाहता अमोल नलावडे यांचे पारडे जड असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आगामी निवडणुकीत हा जनाधार निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
