Tuesday, February 3, 2026

Date:

शिरूरमध्ये अवैध दारूधंद्याचा सुळसुळाट; कारवाई केवळ ‘फार्स’ ठरतेय का?

- Advertisement -

विशाल भालेराव.

विषय हार्ड न्युज,शिरूर : शिरूर शहर व तालुक्यात अवैध दारूधंदा मोठ्या प्रमाणात फोफावला असून, गुटखा, अमली पदार्थ आणि बेकायदेशीर दारूविक्रीने प्रशासनाच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून अधूनमधून कारवाई होत असली तरी ती केवळ दिखाऊ आणि निवडक असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
गेल्या काही दिवसांत पोलिसांनी दोन कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती समोर आली असली, तरी ग्रामीण भागातील गल्लीबोळांत सुरू असलेले अवैध धंदे अद्यापही खुलेआम सुरू आहेत. त्यामुळे “मोठ्या धंदेवाल्यांना अभय, आणि छोट्यांवरच कारवाई?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, अवैध दारूवर कारवाईबाबत पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले की, तरुण पिढी व्यसनाधीन होऊ नये यासाठी गेल्या दोन वर्षांपासून जनजागृतीबरोबरच कठोर कारवाई सुरू आहे. औद्योगिक वसाहतीतील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दक्ष असून, अवैध धंदे मोडून काढण्यासाठी मोहीम अधिक तीव्र केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पिण्याचा खर्च सरासरी ५०० ते १००० रुपयांपर्यंत जात असताना, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही हॉटेल्स व ढाब्यांवर छापे टाकून केवळ ४५० रुपयांची दारू जप्त केली जाते, अशी चर्चा आहे. यावरून कारवाईची गंभीरता आणि हेतूवरच संशय व्यक्त केला जात आहे.
याशिवाय, ‘गुंगीकारक’ पदार्थ मिसळलेल्या पानविक्रीचा नवा प्रकार समोर आला असून, विशेषतः औद्योगिक परिसरात रात्रीच्या वेळेस कामगार व तरुण व्यसनाधीन होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
एकूणच शिरूर तालुक्यात अवैध दारूधंदा आणि व्यसनांचे जाळे वाढत असताना, खरोखर कडक आणि निष्पक्ष कारवाई कधी होणार? असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिस प्रशासनाने मोठ्या धंदेवाल्यांवर हात घालून खाकीवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

खेडशिवापूर–खानापूर गटातून पुजा नवनाथ पारगे रिंगणात‘घड्याळ’ वाजणारच – जनतेचा ठाम निर्धार.

हवेली पश्चिम भागाचा विकासाचा आवाज बुलंद! विषय हार्ड न्युज,खेडशिवापूर :...

कै. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्यावर शोककळा; सुनेत्राताई पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ.

"हा आनंदाचा नव्हे, कर्तव्याचा क्षण; सुनेत्राताई पवार यांची भूमिका...

भावनिक प्रतिक्रिया : अभिनेता व मॉडेल रवींद्र ठाकूर यांचा अजित पवारांबद्दल शब्दांत न मावणारा शोकभाव.

विषय हार्ड न्युज पुणे :महाराष्ट्राच्या राजकीय विश्वाला हादरवून टाकणाऱ्या...