Tuesday, February 3, 2026

Date:

पोलीस की दलाल? खाकीचा बाजार!

- Advertisement -

विषय हार्ड न्युज,वर्धा : वर्धा (शहर) पोलीस स्टेशनमधील तत्कालीन ठाणेदार पराग पोटे यांच्या कारभारामुळे खाकीची प्रतिमा मलीन झाल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत. न्यायाच्या चौकटीत नव्हे तर सौद्यांच्या सावलीत पोलीस ठाणे चालत होते का? असा सवाल नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धा शहर पोलीस ठाण्यातील काही कारवाया संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या असून, कायदा-सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीपेक्षा सेटिंग, दबाव आणि व्यवहार यांना प्राधान्य दिले जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळण्याऐवजी पोलीस ठाण्याच्या दारातच निराशा पदरी पडत असल्याचा आरोप केला जात आहे.
काही प्रकरणांत कारवाईला विलंब, तर काहींना विशेष सवलत दिल्याचे दावे होत असून, यामुळे “पोलीस की दलाल?” असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत. खाकीवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा विश्वास या कारभारामुळे डळमळीत झाल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि खाकीची सन्माननीय प्रतिमा पुन्हा उंचावावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या आरोपांची गंभीर दखल घेऊन सत्य बाहेर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

खेडशिवापूर–खानापूर गटातून पुजा नवनाथ पारगे रिंगणात‘घड्याळ’ वाजणारच – जनतेचा ठाम निर्धार.

हवेली पश्चिम भागाचा विकासाचा आवाज बुलंद! विषय हार्ड न्युज,खेडशिवापूर :...

कै. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्यावर शोककळा; सुनेत्राताई पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ.

"हा आनंदाचा नव्हे, कर्तव्याचा क्षण; सुनेत्राताई पवार यांची भूमिका...

भावनिक प्रतिक्रिया : अभिनेता व मॉडेल रवींद्र ठाकूर यांचा अजित पवारांबद्दल शब्दांत न मावणारा शोकभाव.

विषय हार्ड न्युज पुणे :महाराष्ट्राच्या राजकीय विश्वाला हादरवून टाकणाऱ्या...