Sunday, February 1, 2026

Date:

खानापूर गणात लाला जावळकर यांची गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर दमदार एन्ट्री; प्रचाराला वेग.

- Advertisement -

पायल पोटभरे.

विषय हार्ड न्युज,खानापूर – खानापूर गणात निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून लाला जावळकर यांनी गावोगावी तसेच वाड्या-वस्त्यांवर केलेल्या दमदार एन्ट्रीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्यक्ष जनसंपर्कावर भर देत लाला जावळकर यांनी प्रत्येक गाव, वाडी-वस्ती गाठत नागरिकांशी थेट संवाद साधला.
या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी लाला जावळकर यांचे जल्लोषात स्वागत केले. ढोल-ताशांचा गजर, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांच्या प्रचाराला मोठी चालना मिळाल्याचे चित्र दिसून आले. विशेषतः युवक आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
लाला जावळकर यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत विकास, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्यांना न्याय या मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली. “गावाच्या आणि गणाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असून, शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचा माझा निर्धार आहे,” असे त्यांनी सांगितले.
या दमदार प्रचारामुळे खानापूर गणातील राजकीय समीकरणे बदलू लागली असून, लाला जावळकर यांची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. येत्या काळात त्यांचा वाढता जनसंपर्क आणि लोकांचा विश्वास निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

खेडशिवापूर–खानापूर गटातून पुजा नवनाथ पारगे रिंगणात‘घड्याळ’ वाजणारच – जनतेचा ठाम निर्धार.

हवेली पश्चिम भागाचा विकासाचा आवाज बुलंद! विषय हार्ड न्युज,खेडशिवापूर :...

कै. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्यावर शोककळा; सुनेत्राताई पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ.

"हा आनंदाचा नव्हे, कर्तव्याचा क्षण; सुनेत्राताई पवार यांची भूमिका...

भावनिक प्रतिक्रिया : अभिनेता व मॉडेल रवींद्र ठाकूर यांचा अजित पवारांबद्दल शब्दांत न मावणारा शोकभाव.

विषय हार्ड न्युज पुणे :महाराष्ट्राच्या राजकीय विश्वाला हादरवून टाकणाऱ्या...