Wednesday, February 4, 2026

Date:

खानापूर एकवटले, उमेदवार ठरला – जावळकरांच्या विजयाची जबाबदारी आता संपूर्ण गावाची!खानापूर ग्रामस्थांचा एकमुखी पाठिंबा.

- Advertisement -

विशाल भालेराव
विषय हार्ड न्युज,खानापूर : “मुंबईत ठाकरे कुटुंब, पुण्यात पवार कुटुंब एकत्र येऊ शकते, तर आपण खानापूरकर एकत्र का येऊ शकत नाही?” या ठाम भूमिकेतून खानापूर ग्रामस्थांनी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आपला उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आता संपूर्ण गावाची असून, त्या दृष्टीने समस्त खानापूर ग्रामस्थांनी मा. सरपंच शरद लालाशेठ जावळकर यांना एकमुखी जाहीर पाठिंबा दिला आहे.


गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक कारभारासाठी आणि भविष्यात सक्षम नेतृत्व उभे राहावे या उद्देशाने ग्रामस्थांनी मतभेद बाजूला ठेवत एकनिष्ठपणे जावळकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला आहे. “गावासाठी माणूस निवडायचा, पक्ष नव्हे” या भावनेतून हा निर्णय घेतल्याचे ग्रामस्थांकडून स्पष्ट करण्यात आले.
मा. सरपंच शरद जावळकर यांनी आपल्या कार्यकाळात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य तसेच मूलभूत सुविधांच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला. प्रशासनाशी समन्वय साधत सामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. त्यांच्या नेतृत्वाखाली खानापूर गावाने विकासाची नवी दिशा घेतल्यानेच आज ग्रामस्थांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे.
यावेळी ग्रामस्थ म्हणाले,
“गावाच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे, सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेणारे आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणून शरद जावळकर यांची ओळख आहे. त्यामुळे पंचायत समिती निवडणुकीत त्यांना एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.”
ग्रामस्थांच्या या स्पष्ट आणि ठोस भूमिकेमुळे खानापूर परिसरात सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण झाले असून, पंचायत समिती निवडणुकीत शरद जावळकर यांची उमेदवारी अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.
खानापूर ग्रामस्थांचा हा विश्वास, एकजूट आणि निर्धार आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार, यात शंका नाही.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

खेडशिवापूर–खानापूर गटातून पुजा नवनाथ पारगे रिंगणात‘घड्याळ’ वाजणारच – जनतेचा ठाम निर्धार.

हवेली पश्चिम भागाचा विकासाचा आवाज बुलंद! विषय हार्ड न्युज,खेडशिवापूर :...

कै. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्यावर शोककळा; सुनेत्राताई पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ.

"हा आनंदाचा नव्हे, कर्तव्याचा क्षण; सुनेत्राताई पवार यांची भूमिका...

भावनिक प्रतिक्रिया : अभिनेता व मॉडेल रवींद्र ठाकूर यांचा अजित पवारांबद्दल शब्दांत न मावणारा शोकभाव.

विषय हार्ड न्युज पुणे :महाराष्ट्राच्या राजकीय विश्वाला हादरवून टाकणाऱ्या...