


विषय हार्ड न्युज,शिवापूर (प्रतिनिधी):
दि. १६ जानेवारी रोजी रुडकी, उत्तराखंड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय थ्रो–पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत शिवापूर गावातील कु. तन्वी निलेश शिंदे हिने उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
या स्पर्धेत देशभरातून आलेल्या खेळाडूंना मागे टाकत कु. तन्वीने आपल्या उत्कृष्ट ताकद, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश संपादन केले. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले आहे.
कु. तन्वीच्या या यशाबद्दल शिवापूर परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, कुटुंबीय, मार्गदर्शक, प्रशिक्षक तसेच क्रीडाप्रेमी नागरिकांनी तिचे मनापासून कौतुक केले आहे. भविष्यातही ती आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करेल, असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे.
कु. तन्वी निलेश शिंदे हिला या सुवर्णयशाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
