


विषय हार्ड न्युज,मालखेड – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार साहेब) पक्षाच्या वतीने श्री. धनराज किसन बाप्पु जोरी यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणुकीत पक्षाचे अधिकृत चिन्ह “तुतारी वाजणारा माणूस” असून, हेच चिन्ह घेऊन जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार करण्यात आला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर धनराज जोरी यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
“शरद पवार साहेबांच्या विचारसरणीवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मूल्यांवर विश्वास ठेवून मी ही उमेदवारी स्वीकारली आहे. सामान्य माणसाचा आवाज बनून, विकास, न्याय आणि प्रामाणिकपणा हेच माझे प्रमुख ध्येय असेल. तुतारीचा नाद म्हणजे परिवर्तनाचा आवाज आहे आणि हा आवाज मी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणार आहे.”
धनराज किसन बापू जोरी .
स्थानिक विकास, युवकांना संधी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढण्याचा संकल्प करत धनराज जोरी यांना भरघोस पाठिंबा दिला.
