


विशाल भालेराव
विषय हार्ड न्युज,खानापूर — आज शुक्रवार, दि. ३० जानेवारी २०२६ रोजी संत कृष्णाजी बुवा महाराज जावळकर यांच्या ७० व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचा शेवटचा दिवस भक्तिभावाने साजरा होत आहे. या निमित्ताने आज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ह. भ. प. गंगाराम महाराज राऊत (पैठण) यांचे कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे.
पुण्यतिथीच्या निमित्ताने सकाळी संत कृष्णाजी बुवा महाराज जावळकर यांच्या समाधीस्थळी अभिषेक व धार्मिक विधी पार पडले. हा कार्यक्रम संतांचे पुतणे ह. भ. प. ज्ञानोबा तुकाराम जावळकर व त्यांच्या परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. कीर्तनानंतर सायंकाळी ९ नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून संपूर्ण खानापूर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. संत कृष्णाजी बुवा महाराजांच्या अध्यात्मिक विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प या निमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे.
तरी सर्व ग्रामस्थांनी व भागातील भाविक भक्तांनी वेळेत उपस्थित राहून कीर्तन सेवा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .
श्री विठ्ठल भजनी मंडळ, खानापूर
संत कृष्णाजी बुवा महाराज जावळकर परिवार
