



विषय हार्ड न्यूज (गोऱ्हे बुद्रुक) : शिवसेनेच्या ठाम विचारधारेला बळ देत गो-हे
बुद्रुक गावाने एकमताने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. गावात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी पक्षाची भूमिका, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली दिशा तसेच भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. “एकमताने एक विचार” या तत्वावर गावाचा विकास साधण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला बचत गटाच्या प्रतिनिधी, शिवसैनिक, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आगामी काळात शिवसेनेसोबत खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
शिवसेना प्रमुख रमेश बापू कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती गटातून शुभांगीताई खिरिड यांनी मैदानात जोरदार एन्ट्री घेतली असून,
“माई तुम आगे चलो, हम तुम्हारे साथ है”
अशा घोषणा देत मतदारांनी शुभांगीताई खिरिड यांच्यावर विश्वास व्यक्त केला.
